Monday , December 8 2025
Breaking News

बंगळुरात आग दुर्घटनेत दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू

Spread the love

 

बंगळूर : आज सकाळी नागरथापेटे, हलसुरु गेट येथे प्लास्टिकच्या चटईच्या दुकानात लागलेल्या आगीत दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचे सजीव दहन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
या घटनेत मदन (वय ३८), त्याची पत्नी संगीता (वय ३३), मितेश (वय ८) आणि विहान (वय ५) हे सर्व एकाच कुटुंबातील सदस्य जिवंत जळून मरण पावले. दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सुरेशचाही या आगीत मृत्यू झाला.
नागरथापेटे येथील प्लास्टिक चटईच्या दुकानात पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानात आग लागल्याची घटना घडली.
संदीप आणि बालकृष्ण यांच्या मालकीच्या चार मजली इमारतीत आग लागली, ज्यामध्ये तळमजल्यासह दोन मजल्यांवर गोडाऊन आहे. पहिल्या मजल्यावर झोपलेला सुरेश नावाचा कामगारही या आगीत मरण पावला.
मदन कुमार यांची पत्नी संगीता आणि मुले विहान आणि नितेश तिसऱ्या मजल्यावर राहत होते. या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला.
शहर पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर माध्यमांना सांगितले की, आगीची घटना पहाटे २.३० वाजता घडली. अग्निशमन दल आणि आमच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली आणि मदतकार्य हाती घेतले. आग तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये लागली. त्यानंतर ती वरच्या मजल्यांवर पसरली. आग लागताच इमारतीतील बहुतेक लोक पळून गेले. तथापि, एकाच कुटुंबातील चार जणांसह पाच जण आगीत सापडले.
मृतदेह आधीच बाहेर काढण्यात आले आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी आणि आमचे बचाव पथक या ऑपरेशनमध्ये सहभागी होते, असे त्यांनी सांगितले.
के.आर. मार्केटजवळील नागरथापेटे येथील एका व्यावसायिक इमारतीतील बहुमजली इमारतीला काल रात्री उशिरा आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले, परंतु आत अडकलेले सर्व जण जिवंत जळून खाक झाले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *