कारवार : उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार येथील काँग्रेस आमदार सतीश शैल आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. या दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केल्याचे समजते.
१३ ऑगस्ट रोजी टाकलेल्या छाप्यात ईडीने तब्बल १.६ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, सुमारे ६.७५ किलो सोने आणि १४ कोटींच्या आसपासची बँक खाती फ्रीज केली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर व्यवहार नोंदी आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
२०१० मधील बेलकेरी बंदरातील अवैध लोहखनिज निर्यात घोटाळा प्रकरणामुळे आमदार सतीश सैल यांचे नाव पुढे आले होते. त्या प्रकरणात त्यांना अटकही केली होती. त्याच तपासाचा भाग म्हणून ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. सतीश सैल यांची चौकशीदरम्यान बंगळुरूमध्ये अटक झाली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. ईडीकडून पुढील तपासणी केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta