बेंगळुरू : जातीनिहाय जनगणना कोणत्याही कारणास्तव पुढे ढकलली जाणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे.
कर्नाटकमध्ये जाती जनगणनेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे, ज्यामुळे काही मंत्र्यांमध्येही मतभेद दिसून आले. ही जनगणना पुढे ढकलावी किंवा रद्द करावी, असा दबाव वाढत असताना, मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. मात्र, सर्व चर्चा आणि गोंधळावर पूर्णविराम देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, भाजप फक्त आमच्या सरकारला ‘हिंदुविरोधी’ म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जाती जनगणना पुढे ढकलली जाणार नाही.
Belgaum Varta Belgaum Varta