
तुमकुर : हुंड्यासाठी छळ होत असल्याने या जाचाला कंटाळून दोन मुलांची हत्या करणाऱ्या आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही दुःखद घटना तुमकुर जिल्ह्यातील पावगड तालुक्यातील कडपनकेरे येथे घडली.
२३ वर्षीय सरिता नामक महिलेनेही आत्महत्या करण्यापूर्वी ४ वर्षाचा मुलगा कौशिक आणि २ वर्षाची मुलगी युक्ती यांची हत्या केली. नंतर स्वतः आत्महत्या केली. पावगड पोलिसांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
लग्नापासूनच सरिताचा पती आणि त्याच्या कुटुंबाकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पावगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta