

बेंगळुरू : म्हैसूरमध्ये दहा वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर झालेल्या बलात्कार व हत्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून शिवविच्छेदन तपासणीत आरोपीने मुलीवर बलात्कार करून तब्बल 19 वेळा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे.
सदर आरोपीने झोपलेल्या मुलीला ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिला चाकूने भोसकले व तिची अमानुषरित्या हत्या केली. आरोपीने दारूच्या नशेत सदर कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी कार्तिकला यापूर्वीही अटक केली आहे. तो आधीच एका गुन्हेगारी प्रकरणात तुरुंगात होता. चार महिन्यापूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. तपासांती असे स्पष्ट झाले आहे की, तो आपल्या घरी न जाता दारू पिऊन गावात फिरत होता व गुन्हेगारी कारवाया करीत होता. सदर दुर्दैवी मुलगी व तिचे पालक दसऱ्याच्या आदल्या दिवशी फुगे विक्रीसाठी कलबुर्गी येथून म्हैसूरला आले होते. रात्री तंबूत झोपलेल्या मुलीला ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली असल्याचे समजते.

Belgaum Varta Belgaum Varta