Sunday , December 7 2025
Breaking News

१८ हजार शिक्षकांच्या भरतीची लवकरच अधिसूचना : बंगारप्पा

Spread the love

 

बंगळूर : शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य सरकार लवकरच १८ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे, ज्यामध्ये अनुदानित शाळांसाठी ६,००० अतिथी शिक्षक आणि सरकारी शाळांसाठी १२,००० शिक्षकांचा समावेश आहे.
शिमोगा प्रेस ट्रस्टने येथे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात बोलताना शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा म्हणाले की, त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून ११ महिन्यांत सरकारी शाळांसाठी सुमारे १३,५०० शिक्षकांची नियुक्ती केली आहे.
कन्नड माध्यमाच्या शाळांना वाचवण्यासाठी सरकारने अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदानित शाळांमधील चार ते पाच हजार रिक्त पदांसाठी संबंधित शैक्षणिक संस्थांना अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्याची परवानगी दिली जाईल आणि सरकार मानधन देईल. याशिवाय, त्यांनी सांगितले की, सरकारी शाळांमध्ये १२ हजार आणि अनुदानित शाळांमध्ये सहा हजार अशा १८ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी लवकरच अधिसूचना जारी केली जाईल.

१९९५ नंतरच्या शाळांना अनुदानाचा प्रस्ताव
१९९५ नंतर दहा वर्षांच्या कालावधीत सुरू झालेल्या शाळांना अनुदान योजनेत समाविष्ट करण्यासाठी एक प्रस्ताव तयार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंजुरी दिल्यानंतर ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे मंत्र्यांनी एका प्रश्नाचे उत्तर दिले.
दिव्यांग मुलांना एकाच ठिकाणी उपचार आणि शिक्षण देण्यासाठी सार्वजनिक शिक्षण विभागाकडून दोन नवीन निवासी शाळा उघडल्या जातील अशी घोषणाही त्यांनी केली. सरकार लवकरच टीईटी आणि सीईटी परीक्षांसाठी अधिसूचना जारी करेल असेही त्यांनी सांगितले.
सरकार पुढील शैक्षणिक वर्षापासून किडवाई कर्करोग रुग्णालयाजवळ कर्करोगग्रस्त मुलांसाठी विशेष शाळा सुरू करेल. राज्यातील कोणतीही सरकारी शाळा बंद केली जाणार नाही. जर कमी पटसंख्या असेल तर ती शाळा जवळच्या संस्थेत विलीन केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सरकारी शाळांमध्ये एलकेजी आणि यूकेजी वर्ग सुरू करण्याच्या प्रस्तावाला उत्तर देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्यासाठी निधी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रभारी मंत्री म्हणून त्यांनी सुरू केलेल्या विकासकामांबद्दल बोलताना ते म्हणाले की, माझ्या प्रयत्नांमुळे भद्रा जलाशयाचे क्रेस्ट गेट बदलण्यात आले. शिमोगा विमानतळासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भूखंड देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांच्याशी चर्चा केल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
सोरब येथील रस्त्याच्या बांधकामासाठी निधी वाटप केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *