बेंगळुरू : विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत असलेले काँग्रेसचे सी. एम. इब्राहिम यांनी अखेर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या सी. एम. इब्राहिम यांनी आपल्या विधान परिषद सदस्यपदाचाही राजीनामा दिला आहे. आज सकाळी 11 वाजता विधानसौध येथे विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांच्या कार्यालयात सी. एम. इब्राहिम यांनी राजीनामा सोपविला आहे. सभापतींनी इब्राहिम यांच्या राजीनाम्याचा स्वीकार केला आहे.
राजीनामा सोपविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सी. एम. इब्राहिम म्हणाले, गुरुवार हा सर्व धर्मीयांसाठी शुभ दिवस असल्याचे मानले जाते. याचे औचित्य साधूनच मी माझ्यावरील ओझे काढून टाकले आहे. यापुढे मी राष्ट्रीय नेते देवेगौडा यांच्या दिशेने वाटचाल करणार असून माझ्यासह अनेकजण जेडीएसमध्ये समावेश करण्यासाठी तयार असल्याचे इब्राहिम म्हणाले. मी कुणावरही जबरदस्ती केली नसून जेडीएस अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वप्रथम जेडीएस, त्यानंतर भाजप आणि सर्वात शेवटी काँग्रेस अशाच पद्धतीने पंजाबमध्ये झालेल्या वातावरणाची पुनरावृत्ती आता कर्नाटकात देखील होणार असल्याचे सी. एम. इब्राहिम म्हणाले.
यासंदर्भात मी कोणत्याही पक्षावर टीका करणार नाही. कोणावर ओरडणार देखील नाही. यापुढे आपण बसवण्णांच्या तत्वानुसार मार्गक्रमण करणार असून जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद घेऊन पुढे वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये माझे अनेक चांगले मित्र आहेत. स्वयंप्रेरणेने मी काँग्रेस पक्ष सोडला आहे.
Check Also
अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स
Spread the love बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …