
कलबुर्गी : कलबुर्गी येथे शांतलिंग स्वामीजींनी मठाच्या आवारात उभे राहून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
येथील उडचन गावातील हिरेमठ शांतलिंग स्वामीजी काही दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत आले होते आणि मठात गोंधळ घातला होता. यामुळे भाविक संतप्त झाले आणि त्यांनी स्वामीजींना मठाबाहेर काढले. नवीन मठाधीश नियुक्त करण्याबाबतही चर्चा सुरू झाली. मात्र शांतलिंग स्वामीजी आठवडाभरापूर्वी पुन्हा मठात दाखल झाले. त्यांनी मठ परिसरात हवेत गोळीबार करून एकप्रकारे विरोधकांना धमकीच दिली आहे. स्वामीजींच्या या वर्तनामुळे संताप निर्माण झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta