
चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ही खासगी बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात होती. दरम्यान, रात्री उशिरा विरुद्ध दिशेनं येणारी एक लॉरी डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. याच वेळी समोरून येणाऱ्या या बसला लॉरीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की बसने लगेचच पेट घेतला.
या भीषण अपघातात गाढ झोपलेल्या दहा जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने हिरियुर आणि चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta