Sunday , September 8 2024
Breaking News

…आता बस प्रवास देखील महाग!

Spread the love


बेंगळुर : महागाईच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून याची झळ मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पेट्रोल, डिझेल, दैनंदिन गरजेच्या वस्तूंसहित आता बस प्रवास देखील महागला आहे. गदग-हुबळी बस प्रवासाच्या तिकीट दरात अचानक वाढ करण्यात आली असून तिकीट दरात करण्यात आलेल्या वाढीवर जनता संताप व्यक्त करत आहे. सर्वसामान्य जनता आधीच महागाईच्या झळा सोसत आहे. महागाई आणि दरवाढीच्या विळख्यात अडकलेल्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला आता बस प्रवासाचीही झळ बसणार आहे. गदग – हुबळी बस प्रवास तिकीट दरात अचानक 15 रुपयांची वाढ करण्यात आली असून अचानक वाढलेल्या तिकीट दरामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. हुबळी ते गदग हा पल्ला 60 किलोमीटर आहे. या पल्ल्याच्या प्रवासासाठी सुरुवातीला 60 रुपये दर आकारण्यात येत होता. मात्र अचानकपणे 15 रुपयांची तिकीट दरवाढ करण्यात आली असून परिणामी गदग, कोप्पळ, गंगावती, बेळ्ळारी, होस्पेट याठिकाणी कामानिमित्त प्रवास करणार्‍या नागरिकांना अतिरिक्त तिकीटदराचा मोठा फटका बसत आहे.
हुबळी बाहेर असणार्‍या परिसरातील नेलवडी गावाजवळ सुरु करण्यात आलेल्या टोल नाक्यामुळे बस प्रवास दरात वाढ झाली आहे. गदग ते कोप्पळ दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांना अतिरिक्त तिकीटदर मोजावा लागत आहे. बस तसेच लॉरी आणि अवजड वाहनांसाठी एकतर्फी प्रवासासाठी 395 आणि रिटर्न प्रवासासाठी 595 रुपये दर मोजावे लागत आहेत. यामुळेच परिवहन संस्थेने बस तिकीट दरात वाढ केल्याची शक्यता आहे. या सार्‍यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. ‘दुष्काळात तेरावा महिना’ या उक्तीप्रमाणे दैनंदिन आयुष्यात महागाईच्या झळांची तीव्रता आणखीन वाढत चालली आहे. याचा अधिकाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून वाढत्या पेट्रोल, डिझेल दराप्रमाणेच बस प्रवासात देखील झालेल्या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खर्चात आणखीन वाढ झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मला “चिंता किंवा तणावग्रस्त” होण्याचे कारणच नाही

Spread the love  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; विरोधकांचा दावा फेटाळला बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *