
बेंगळुर : राज्यातील पीएसआय भरती घोटाळा आणि 402 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर या प्रकरणी निश्चितच कारवाई होईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी शनिवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, कोणताही घोटाळा झाला असेल तर त्याची योग्य चौकशी करण्यात येईल. घोटाळ्यात सहभागी असलेल्यांचे ऑडिओ संभाषण, पुरावे ताब्यात घेऊन त्याआधारे चौकशी करण्यात येईल. दोषी कोणीही, कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे बोम्मई यांनी स्पष्ट केले. दिल्ली दौर्यासंदर्भातील प्रश्नावर सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांची बैठक असल्याने दिल्लीला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
बेंगळुरातील काही कॉलेजना बॉम्बने उडवून धमकी दिल्याचे ईमेल आल्याबद्दलच्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, मला याबाबत माहिती नाही. पोलीस आयुक्तांशी चर्चा करून माहिती घेईन. कोण धमकी दिलीय याच्या शोध घेऊन चौकशी करण्यात येईल. कोणत्याही देशातून धमकीचे मेल किंवा फोन आलेला असल्यास तो ट्रेस करून धमकी देणार्यांना अटक केली जाईल. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta