
हुबळी : हुबळीची दंगल ही पूर्वनियोजित दंगल आहे. एआयएमआयएम असो किंवा इतर संघटनांवर पोलीस कारवाई करत आहेत. केवळ भावना भडकल्याने घडलेली ही घटना नाही. मंदिरांवर, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. जे कोण याला जबाबदार आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही, असे भाजपचे अध्यक्ष नलिनकुमार कटिल यांनी सांगितले.
कटिल यांनी आज हुबळीतील मंदिर आणि पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सिद्धरामय्या हे एक अक्षम राजकारणी आहेत. सध्याच्या जातीय दंगली हे त्यांनी मुख्यमंत्री असताना जे काही केले त्याचा परिणाम आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना हिंदूंवर सातत्याने अन्याय होत होता. केरळमधून येऊन येथे दंगल घडवण्यात येत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सॉफ्ट कॉर्नर दाखविण्यात आला. गुन्हेगारांना सोडून देण्यात आले. एवढेच काय तर तुरुंगातूनही सोडून देण्यात आले. त्यामुळेच या दंगलीला प्रेरणा मिळाली. आता ते आमच्या सरकारवर काय बोलणार? असे कटील म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta