Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटकात लवकरच मुख्यमंत्री बदल!

Spread the love

आम.बसनगौडा पाटील यत्नाळ यांचा गौप्यस्फोट

विजापूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच खळबळ उडवून देणाऱ्या भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी कर्नाटकात लवकरच मुख्यमंत्री बदल केला जाईल असा नवा गौप्यस्फोट केला आहे. यासंदर्भात विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले, राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्री बदलासंदर्भात भाजप पक्षश्रेष्ठी आणि हायकमांड विचार करत आहे. याबाबत आपल्याला माहिती उपलब्ध झाली आहे.पक्षाच्या आणि राज्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी व्यक्त केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्र्चनेसंदर्भात काही आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे पक्षाला हानी होत आहे. यावर विचार विनिमय करून योग्य निर्णय घेण्यासाठी हायकमांड राज्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *