बागलकोट : कर्नाटकातील बागलकोटमध्ये एका महिला वकिलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्या संबंधित महिला वकीलला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. तिला वाचवण्यासाठी कोणीही मदत करण्यास येत नसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. महिला वकिलला एक व्यक्ती बेदम मारहाण करत असताना तिथे असलेले नागरिक पाहत उभारले असल्याने सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, संगीता शिकेरी असे या महिला वकिलाचे नाव असून त्या हल्लेखोराचे नाव महांतेश असे आहे. मालमत्तेवरून या दोघांमध्ये वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित महिला वकिलाने त्या भागांतील भाजपचे सरचिटणीस राजू नाईकर यांच्याविरोधात तक्रार दिली असल्याची बातमी समजताच महांतेश खवळला आणि त्याने महिला वकिलला मारहाण केली.
सध्या या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. या हाणामारीत महिला जखमी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्या महिला वकिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेकडून तक्रार नोंदवून घेतल्यानंतर महांतेश कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ या घटनेचे सत्य असल्याचे पोलिसांचे स्पष्ट केल आहे.
Belgaum Varta Belgaum Varta