बेंगळुर : मूळचे कर्नाटकातील चंद्र आर्य यांनी कॅनडा संसदेत कन्नड भाषेत भाषण केले आहे. कन्नड संस्कृती आणि मातृभाषेचा अभिमान बाळगत त्यांनी आपले मनोगत कन्नड भाषेत कॅनडा येथील संसदेत मांडले आहे. कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील शिरा या तालुक्यातील द्वाराळू या गावातील चंद्र आर्य हे कॅनडास्थित आहेत. कॅनडामधील संसदेत त्यांनी आपल्या मातृभाषेतून म्हणजेच कन्नडमधून भाषण केले आहे. तेथे जाणार्या अनेक भारतीयांकडून हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केला जातो मात्र चंद्र आर्य यांनी आपल्या मातृभाषेतून आपले मनोगत व्यक्त करून कन्नड भाषिकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.
1967 मध्ये लोकसभेत दिवंगत जे. एच. पटेल यांनी सर्वप्रथम कन्नडमध्ये भाषण केले होते. त्यानंतर अनंतकुमार आणि अनेकांनी प्रमाण भाषेत शपथ घेतली. भारतीय लोकसभेत देखील हिंदी आणि इंग्रजी भाषेतून व्यवहार होतात. मातृभाषेतून मुद्दे मांडणे हि अत्यंत दुर्मिळ बाब आहे. अनेक खासदारांनी आपल्या मातृभाषेत भारतीय संसदेत शपथ घेतल्याचे आपण पाहिले आहे मात्र कॅनडामध्ये झालेल्या कन्नडमधील भाषणामुळे हा विषय चर्चेचा ठरत आहे. चंद्र आर्य यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रकवी कुवेम्पू आणि कन्नड अभिनेते राजकुमार यांचा उल्लेख केला. चंद्र आर्य यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ आज समाजमाध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta