Monday , December 8 2025
Breaking News

अनुसूचित जाती-जमाती राज्य विकास परिषदेची बैठक; एससीएसटी समाजाच्या विकासासाठी २८ हजार कोटींची मंजुरी

Spread the love

बेंगळुरू : मागील वर्षी एससीपी, टीएसपी अनुदान कोणत्या विभाग किती देण्यात आले आहे? बचत किती आहे? याची पडताळणी करून त्यात काही बदल करून एकूण २८ हजार कोटी रुपयांचे अनुदान एससीएसटी समाजाला देण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. आज बेंगळुरूमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली एससीएसटी समाज विकास परिषदेची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीनंतर प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, विविध विभागांना एससीपी आणि टीएसपी अनुदान वितरित करण्यासाठी उच्चस्तरीय परिषद होती. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. एससीएसटी समाजासाठी एकूण २८ हजार कोटींच्या अनुदानासाठी मंजुरी देण्यात आली असून मागील वर्षीपेक्षा यंदा अनेक विभागातील अनुदानात वाढ करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागासाठी ५०० कोटी, कृषी विभागासाठी १०६१ कोटी, फलोत्पादन विभागासाठी १८७ कोटी, आरोग्य विभागासाठी १३०० कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्थळांच्या विकासासाठी २० कोटी, एससीएसटी विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास, सहकार विभागासाठी २०३ कोटी, महसूल विभागातील पेन्शनमध्ये २०० रुपयांची वाढ, असे एकूण ३७४८ कोटी, कौशल्य विकासासाठी १८० कोटी अशा पद्धतीने अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
गंगा कल्याण योजनेसाठी ९ हजार कोटी मंजूर करण्यात आले असून मलेनाडू आणि किनारपट्टी विकास महामंडळाच्या व्याप्तीतील सर्व आमदार, विधान परिषद सदस्यांनी प्रत्येकी १ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. गंगा कल्याण योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *