Tuesday , March 3 2026
Breaking News

रयत विद्या योजनेच्या धर्तीवर सफाई कामगारांच्या मुलांसाठी योजना

Spread the love

बेळगाव : कंत्राटी सफाई कामगाराना सेवेत कायमस्वरूपी ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून तात्विक मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अंतिम निर्णय एक समितीद्वारे घेण्यात येणार असल्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यात सदर समिती आपला अहवाल सादर करणार आहे. सफाई कामगारांच्या मागणीनुसार या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याचा निर्णय होईपर्यंत समान कामासाठी समान वेतन देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच लवकरात लवकर आपत्ती भत्ता देखील या सफाई कामगारांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रयत विद्या योजनेच्या धर्तीवर सफाई कामगारांच्या मुलांसाठी एक नवी योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी स्पष्ट केले. सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनाच्या धर्तीवर झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
सफाई कामगारांबाबत आयपीडी सालप्पा, चंद्रशेखर तसेच आयोगाकडून विविध शिफारशी करण्यात आल्या आहेत. याबाबत अभ्यास करून कामगारांसाठी एक नवे धोरणर तयार करण्यात येणार आहे.
देशातील अन्य राज्यातील सफाई कामगारांना देण्यात येत आसलेल्या सोई सुविधाची माहिती घेऊन महत्वाच्या सुविधा कर्नाटकातील सफाई कामगारांना लागू करण्यात येणार आहेत. तसेच सफाई कामगारांना लागू असलेल्या गृहभाग्य योजनेचा लाभ यापुढे कंत्राटी सफाई कामगारांना देखील लागू करण्यात येणार आहे. तसेच शासकीय महिला कर्मचाऱ्यांप्रमाणे महिला सफाई कामगारांना देखील सर्व सुविधा लागू करण्यात येणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *