
हुबळी : तांत्रिक कारणामुळे दोन लाख घरांना मंजुरी मिळण्यास विलंब झाला होता, तो आता दूर करण्यात आला आहे. कच्च्या घरांचे पक्क्या घरात रूपांतर करण्याचा विचार आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
हुबळी शहरातील विमानतळावर शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पाण्याचा वापर प्रमाणानुसार करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे दोन लाख घरांना मंजुरी मिळण्यास विलंब झाला होता, त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कच्ची घरे पक्की करण्याचा निर्णय झाला आहे. राज्यातील पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर मी पूरग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांसोबत यापूर्वीच बैठक घेतली आहे. महाराष्ट्र आणि आपल्या राज्यातील जिल्हाधिकारी एकमेकांच्या संपर्कात असून पूर परिस्थितीच्या माहितीचे आदानप्रदान करत आहेत. नदीच्या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. राज्यात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून लवकरच केंद्र सरकारला सादर केला जाईल. सर्व जिल्हा पालकमंत्र्यांनी त्यांच्या संबंधित जिल्ह्यात पूर पुनर्वसन कार्यात सक्रिय असल्याची माहिती यापूर्वीच दिली असून मी त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असतो असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले. यावेळी मंत्री बी. सी. पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta