बेंगळुरू : केंद्र सरकारच्या जीएसटी वाढवण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज समर्थन केले. अनेक वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणल्याचा आणि जीएसटी वाढविल्याचा भार ग्राहकांवर पडणार नाही असा दावाही त्यांनी केला.
सोमवारी विधानसौधमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क मुख्यमंत्री बोम्मई यांनी बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, जीएसटी वाढ आणि विस्ताराचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही. त्याऐवजी पॅकिंग आणि विक्री करणार्यांवर 5% जास्त जीएसटी लावण्यात आला आहे. त्यांना तो परत मिळवण्याची तरतूद आहे. त्यांनी तो परत मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यामुळे ग्राहकांवर पडणारा कराचा बोजा टळेल. व्यापार्यांनी जीएसटीचा भार ग्राहकांवर न टाकता जीएसटी परत मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासंदर्भात जीएसटी कौन्सिलमार्फत सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta