बेंगळुरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार कर्नाटक दुग्ध महामंडळ अर्थात केएमएफने दही, ताक आणि लस्सीच्या दरात कपात केली आहे.
केंद्र सरकारने पॅकेज्ड दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लादल्यामुळे केएमएफने नंदिनी दही, ताक, लस्सीच्या दरात वाढ केली होती. बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार, त्यामुळे राज्यात टीकेची झोड उठली होती. त्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी दरात कपात करण्याची सूचना केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या कर्नाटक दूध महामंडळाने आपल्या दग्धोत्पादनांच्या दरात कपात केली आहे. काल संध्याकाळपासून ही दरकपात लागू करण्यात आली आहे. 10 रुपयांच्या 200 ग्रॅम दह्याच्या पॅकेटसाठी 12 रुपये इतका दर वाढवला होता. तो आता त्यांनी 10 रुपये 50 पैसे इतका कमी केला आहे. 200 मिली ताकाचे पाकीट जे 7 रुपये होते ते 8 रुपये करण्यात आले होते. आता ते 7 रुपये 50 पैसे कमी केले आहेत. त्याचप्रमाणे 200 मिली लस्सीचे पॉकेट जे 10 रुपये होते ते 11 रुपये करण्यात आले. आता त्यांनी 10 रुपये 50 पैसे इतके कमी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta