Tuesday , March 3 2026
Breaking News

हुबळीजवळ अग्निकांडात चौघे जळाले?

Spread the love

 

हुबळी : भीषण अग्निकांडात चौघे होरपळून मरण पावल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. हुबळीबाहेरील तारिहाळ येथील एका खासगी कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यात चारहून अधिक कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. ही आग कशी लागली? नक्की किती लोक मरण पावलेत याचा तपास करण्यात येत आहे. हा सर्व तपशील अद्याप शकला नव्हता. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान, बचाव पथक आणि हुबळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून आग विझविण्याचे आणि बचाव कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिमोग्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

Spread the love  क्रिकेट सामन्यातील वादातून घटना, सात अल्पवयीन ताब्यात बंगळूर : शिमोगा येथे सुलेबैलू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *