बोम्मईंचा खेळण्याप्रमाणे वापर, कॉंग्रेसची टीका
बंगळूर : केंद्रीय मंत्री अमित शहा राज्यात आल्यानंतर नेतृत्व बदलाची हाक पुन्हा एकदा समोर आली आहे.
भाजपमधील सध्याच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत काँग्रेसने अनेक ट्विट केले आहेत. त्यात म्हटले आहे, की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ‘केशव कृपा’ वाले जनता परिवाराचे सदस्य असलेल्या बसवराज बोम्मई यांना ‘संघ परिवार’ म्हणून स्वीकारण्यास कधीच सहमती दर्शवणार नाहीत.
भाजप हायकमांड बोम्मई यांचा पप्पेट सीएम म्हणून खेळण्यासारखा वापर करत आहेत. या बदलाच्या प्रयत्नाला सरकारचे अपयश कि तिसरा मुख्यमंत्री आनण्याचा तुमचा संप्रदाय, याचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
बोम्मईसाहेब, मुख्यमंत्रिपदाची बदलाची परंपरा सुरू झाली आहे, खुर्चीतून उतरण्यासाठी तुम्ही दिवस नाही तर तास मोजत आहात. बोम्मईसाहेब, मुख्यमंत्री बदलण्याचे कारण काय, हे तुमचे प्रशासकीय अपयश आहे का? की नेत्यांमधील भांडण? की येडियुरप्पांचा राग, असा सवाल काँग्रेसने केला
अमित शहा यांनी येऊन राज्य सोडल्यानंतर भाजपमध्ये ढगाळ वातावरण आहे. ४० टक्के कमिशनच्या सरकारमध्ये ‘तृतीय मुख्यमंत्री’ पदाची वेळ जवळ आली आहे. बोम्मईंची कठपुतळी संपुष्टात आली आहे. याचे उदाहरण म्हणजे अमित शहा यांच्या दौऱ्याबद्दल सरकारचा एकही मंत्री बोलला नाही आणि कोणताही उत्सव झाला नाही.
सीएम बोम्मईसाहेब, भाजपच्या बनावट नोटांच्या धंदेखोरांशी तुमचा काय संबंध? समाजकंटक, बिटकॉइन धंदेखोर, ४० टक्के कमिशनचे गिऱ्हाईक, बेकायदेशीर भरती करणारे, बनावट नोट तस्कर यांच्याशी तुमचा काय संबंध? मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवण्यासाठी तुम्ही या सर्व प्रकारच्या भ्रष्ट लोकांना पाठीशी घालत आहात, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta