राज्यातील १८ पोलिस अधिकाऱ्यांना पदक जाहीर
बंगळूर : देश ७५ वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाचा एक भाग म्हणून दरवर्षी देण्यात येणारे पोलिस सेवेसाठीचे राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये व्यवसायात भरीव सेवा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने राष्ट्रपती पदक जाहीर केले आहे. यामध्ये राज्यातील १८ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाले आहे. त्यात बेळगावच्या विशेष शाखेचे एएसआय डी. बी. शिंदे यांचा समावेश आहे.
पदक प्राप्त पोलिस अधिकारी डी. बी. शिंदे, एएसआय बेळगाव विशेष शाखा, नांजप्पा श्रीनिवास, एसपी आणि मुख्य पोलिस अधिकारी प्रशिक्षण शाळा कडूर, प्रतापसिंह तुकाराम थोरात, डीवायएसपी, आयएसडी, नंबूर श्रीनिवास रेड्डी, डीवायएसपी, सीआयडी फॉरेस्ट सेल, नरसिंहमूर्ती पिल्लमुनिअप्पा, डीवायएसपी सीआयडी, प्रकाश .आर, डीवायएसपी एसीबी, शिवकुमार टी. एम, एसीपी सुब्रमण्यपूर बंगळूर, झाकीर हुसेन, एसीपी गुलबर्गा उपविभाग, राघवेंद्र राव, एसीपी बंगळूर, राज चिक्कहनुमेगौडा म्हैसूर, डी. बी. पाटील, सर्कल इन्स्पेक्टर, विजयपुर रेल्वे, महम्मद अली, इन्स्पेक्टर एसीबी, रवी बेलवडी, इन्स्पेक्टर शृंगेरी पोलीस स्टेशन, मुपीद खान, स्पेशल आरपीआय, केएसआरपी, मुरली रामकृष्णप्पा, एआरएसआय, महादेवय्या, आरएसाय, रणजित शेट्टी, एएसआय केम्पेगौडानगर पोलीस स्टेशन, बसवराजू .बी, विशेष एआरएसआय राज्य गुप्तचर
Belgaum Varta Belgaum Varta