बंगळूर : कायदा मंत्री जे.सी. मधुस्वामी आणि चन्नपटण येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण शनिवारी व्हायरल झाले. यावरून कॉंग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. आम्ही येथे सरकार चालवत नाही, तर व्यवस्थापन करतो, असे मधूस्वामी यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
या संदर्भात कांही पत्रकारांनी मधूस्वामी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ऑडिओ क्लिपची सत्यता सत्यापित करता आली नाही. आम्ही इथे सरकार चालवत नाही आहोत, आम्ही फक्त व्यवस्थापन करत आहोत, पुढील ७-८ महिने खेचत आहोत, असे मधूस्वामी म्हणताना चित्रफीतमध्ये ऐकू येते.
भास्कर यांनी त्यांना व्हीएसएसएन बँकेची फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी फोन केला होता. मला या समस्या माहित आहेत. मी हे सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. ते कारवाई करत नाहीत. काय करायचं? असे मधूस्वामी ऑडिओत म्हणताना आढळून येतात.
भाजप सरकारवर निशाणा साधण्यासाठी काँग्रेसने ही ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निष्क्रिय कारभाराचे यापेक्षा चांगले उदाहरण काय असू शकते? ही मंत्री मधूस्वामींची लाचारी, त्यांच्याच सरकारवरचा आरोप की बोम्मईच्या कारभाराविषयीची नाराजी? हे दुर्दैवी आहे की ‘डबल इंजिन’ सरकारला फक्त खेचणे भाग पडले आहे, असे कॉंग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta