Wednesday , March 4 2026
Breaking News

शिवमोगा शहरातील चाकूहल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक

Spread the love

 

शिवमोगा : शिवमोगा येथे काल सावरकर- टीपू सुल्तान फलकावरून उद्भवलेल्या वादादरम्यान प्रेमसिंग नावाच्या तरुणावर चाकूने वार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी गोळ्या झाडून त्याला ताब्यात घेतले.

जबीउल्ला (30, रा. मारनाबीबैलू) याच्यावर पोलिसांनी गोळ्या झाडून अटक केली. पहाटे 2.30 च्या सुमारास तीर्थहळ्ळी रोडवरील नमोशंकर ले-आऊट येथे एकावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यासाठी पोलीस गेले असता त्याने पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी निरीक्षक मंजुनाथ कुरी यांनी स्वसंरक्षणार्थ आरोपीच्या पायात गोळी झाडून त्याला अटक केली. गोळी झाडून जखमी झालेल्या आरोपीवर शिवमोगा येथील मेगन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, चाकूने वार करण्यात आलेल्या प्रेमसिंग यांची प्रकृती गंभीर असून शिवमोगामध्ये तणावाचे वातावरण कायम आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *