बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला.
बंगळुरूमधील डॉलर्स कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी रात्री १० वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ एम. एस. रामय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.