बेंगळुरू : वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचे निधन झाले.
त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रात्री 10.30 च्या सुमारास उमेश कत्ती घरी कोसळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बंगळुरूच्या डॉलर्स कॉलनीत उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला. मंत्र्याला एमएस रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. इमर्जन्सी युनिटमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
हे वृत्त समजताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि अनेक मंत्र्यांनी रुग्णालयात धाव घेतली. कत्ती यांची प्रकृती चिंताजनक होती.
उद्या त्यांचे पार्थिव बेळगावला आणण्यात येणार आहे.