Monday , December 8 2025
Breaking News

‘पेटीएम’ मॉडेलवर ‘पेसीएम’ पोस्टर व्हायरल

Spread the love

 


भ्रष्टाचाराविरोधात क्यूआर कोडसह काँग्रेसचा प्रचार; भाजप, काँग्रेसमध्ये क्यूआर कोडची लढाई

बंगळूर : भाजप आणि काँग्रेसमध्ये क्यूआर कोडची लढाई सुरू झाली आहे. पेटीएमच्या मॉडेलवर तयार केलेले ‘पेसीएम’ पोस्टर्स शहराच्या अनेक भागात लावण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे चित्र असलेले हे पोस्टर्स बंगळुर शहरात ठिकठिकाणी चिकटवण्यात आले आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्याने राज्य सरकारच्या विरोधात तक्रारींसाठी काँग्रेस युनिटने अलीकडेच सुरू केलेली ‘४० टक्के कमिशन सरकार’ वेबसाइट समोर येईल.
शहरातील जयमहल रोडवरील इंडियन एक्स्प्रेसजवळ भिंतीवर बसवराज बोम्मई यांचे पेसीएम म्हणून चित्र असलेले पोस्टर लाऊन भ्रष्ट सरकार म्हणून खिल्ली उडवण्यात आली. येथे ४० टक्के कमिशन स्वीकारले जाते असे पोस्टरवर लिहिले आहे.
पेटीएम मॉडेलमध्ये सीएम बसवराज बोम्मई यांचा फोटो क्यूआर कोडवर पेसीएम म्हणून ठेवण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस सरकारविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक असलेले पोस्टर लावण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानाजवळही एक पोस्टर लावण्यात आले आहे.
तुम्ही ते स्कॅन केल्यास, ४० टक्के कमिशन स्टार्स नावाचे पेज उघडेल. रोड स्कॅम, बिटकॉइन स्कॅम, पीएसआय स्कॅम पेज दिसेल. आतापर्यंत स्कॅन केलेल्या लोकांची संख्या ९५ हजार ४२८ आहे. स्कॅन केल्यानंतर, तुम्हाला एक संदेश मिळेल की तुम्हाला मोहिमेत समाविष्ट केले गेले आहे.
एफआयआर दाखल
या संदर्भात, कर्नाटक ओपन स्पेस (डिसऑर्डर प्रतिबंध) कायद्यांतर्गत केंद्रीय विभागात एफआयआर नोंदवण्यात आला असून संबंधित डीसीपींकडून माहिती मागवण्यात आली आहे.
बंगळुर शहराचे पोलिस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिस आता सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
आयुक्तांनी सर्व डीसीपींना त्यांच्या विभागात असे पोस्टर्स तपासून गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोस्टर्सबाबत हाय ग्राऊंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मध्य विभागाचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) वैयक्तिकरित्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
अन्य ठिकाणी पोस्टर्स आढळल्यास संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. ज्या हॉटेलमध्ये पोस्टर सापडले त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले,’ असे आयुक्तांनी माध्यमांना सांगितले.
बसस्थानकांवर आणि बांधकामाच्या ठिकाणी पोस्टर लावले आहेत. मेखरी सर्कल, पॅलेस रोड, बाळेकुंद्री सर्कल आणि इतर ठिकाणी लावण्यात आलेली बहुतांश पोस्टर्स पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आधीच साफ केली आहेत.

राहुलच्या चित्रासह क्यूआर कोड करा
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा फोटो आणि ‘पेसीएम’ चिन्हे असलेली पोस्टर्स बंगळुरमध्ये दिसू लागल्यानंतर, भगवा पक्षाने काँग्रेसला ‘भारत जोडो यात्रे’ला “भीक” मागण्यासाठी राहुल गांधींच्या फोटोसह क्यूआर कोड पोस्ट करण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वी कोल्लममधील एका भाजी विक्रेत्याला काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षासाठी देणग्या दिल्याबद्दल धमकावल्याच्या संदर्भात भगवा पक्षाचा उपहास होता.
भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केरळच्या कोल्लममध्ये एका भाजी विक्रेत्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेसवाले, तुम्ही राहुल गांधींचा फोटो पोस्ट करू शकत नाही, क्यूआर कोड बनवू शकत नाही आणि यात्रेसाठी भीक मागू शकत नाही का?, असे कर्नाटक भाजपने ट्विट केले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *