रायचूर : राज्यातील रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मानवी तालुक्यातील कुर्डी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे.
परमेश, जयम्मा आणि भरत अशी मृतांची नावे आहेत. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना भिंत कोसळली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta