बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचार्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या एक जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्त्यात 3.75 टक्के वाढ करण्याचे आदेश जारी केले आहेत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, राज्य सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून 3.75 टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने 1,282.72 कोटी रुपये वार्षिक खर्च दिला जाईल. याबाबत सरकारी आदेश जारी केला जाईल, असे ट्विट त्यांनी केले.
नुकताच केंद्र सरकारनेही आपल्या कर्मचार्यांना महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta