Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटकातील फरार आरोपी वनविभागाच्या ताब्यात

Spread the love

 

मालवण : कर्नाटक राज्यातील वेगवगेळ्या गुन्ह्यातील आरोपी कमलाकर नाईक (रा. शिराली, ता भटकळ, जि. उत्तर कर्नाटक) या फरार सराईत आरोपीला अटक करण्यात आली. वनपरिक्षेत्र कुडाळ व कर्नाटकातील मानकीच्या वनपरिक्षेत्र टीमने संयुक्त कारवाई करत कातवड (ता. मालवण) येथून ताब्यात घेतले.

शासकीय जंगलातील मौल्यवान साग वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याने त्याच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 च्या विविध कलमान्वये तसेच अनुसूची 3 मधील वन्यप्राणी सांबराच्या शिकारीसाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील दोन दिवसापासून आरोपी आपली लोकेशन बदलून हुलकावणी देत होता. अखेर त्याला ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले.

ही कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी एस. एन. रेड्डी, कर्नाटक राज्य उपवनसंरक्षक रवीशंकर सी. होनावर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे, मानकीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सविता देवाडिगा, मानकीच्या उपवनपरिक्षेत्र अधिकारी संदीप आरकसाली, मालवणचे वनपाल श्रीकृष्ण परीट, मठचे वनपाल सावळा कांबळे, महेश पाटील, दत्तगुरु पिळनकर, योगेश मोगेर, ईश्वर नाईक यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *