Wednesday , March 4 2026
Breaking News

2-डी नको, 2-ए च पाहिजे, लढा सुरूच राहणार : बसवजय मृत्युंजय स्वामीजी

Spread the love

 

बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आईची शपथ घेत 29 डिसेंबर रोजी पंचमसालीना आरक्षणाची घोषणा केली. पण त्यांनी आम्हाला अपेक्षित आरक्षण दिले नाही. पंचमसाली समाज हे 2 डी आरक्षण नाकारतो असे सांगत 2 ए आरक्षणासाठीचा आमचा लढा सुरूच राहील असे कुडलसंगमपिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बेळगावातील गांधी भवनमध्ये आज गुरुवारी पंचमसाली समाजाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वामीजी म्हणाले की, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, आम्हाला आरक्षण मिळणार की नाही हे 24 तासांत स्पष्ट करावे. सरकारने या महिन्याच्या 12 तारखेपर्यंत आरक्षण जारी करून राजपत्रात तशी घोषणा करावी. ही घोषणा न झाल्यास 13 जानेवारीला हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर एकदिवसीय तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.स्वामीजींनी यावेळी ‘पंचमसालींचे पाऊल हावेरीकडे’ या आंदोलनाची घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीचा निर्णय आम्ही फेटाळून लावतो. हावेरीत 30 ते 40 हजारांहून अधिक लोकांसोबत आम्ही आंदोलन करणार आहोत. 2 ए आरक्षणाची घोषणा न झाल्यास हावेरी येथे पुढील लढ्याची रूपरेषा जाहीर करू, असे ते म्हणाले.या लोकशक्तीचा 2023 च्या निवडणुकांवर परिणाम होईल. पंचमसाली समाज सर्व प्रकारच्या लढ्यासाठी मजबूत, सज्ज आहे. जी सुविधा 2 ए आरक्षणात आहे तीच आम्हाला द्यावी. सरकारच्या 2 डी आरक्षणामुळे संभ्रम निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *