Wednesday , December 10 2025
Breaking News

आपची ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बैलहोंगलमधून चिक्कनगौडर, अथणीतून संपतकुमार शेट्टी

Spread the love

 

बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रथमच पदार्पण करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील सर्व २२४ विधानसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले.
पक्षाचे राज्य प्रमुख पृथ्वी रेड्डी यांनी यादी जाहीर केल्यावर दावा केला की, आप हा झपाट्याने वाढणारा राजकीय पक्ष असल्याने तरुण, शेतकरी आणि महिलांना महत्त्व प्राप्त झाले आहे. हे उमेदवार (यादीत) समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करतात. आमच्या उमेदवारांच्या यादीचे सरासरी वय फक्त ४६ वर्षे आहे. आमचे ५० टक्क्यांहून अधिक उमेदवार हे ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, असे ते म्हणाले.
या यादीमध्ये सक्रियतेची पार्श्वभूमी असलेले उमेदवार आणि अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांचा समावेश आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी मतदारसंघातून संपतकुमार शेट्टी, बैलहोंगलमधून बी. एन. चिक्कनगौडर, रामदुर्गमधून मलिकजॉन नदाफ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय शिवरायप्पा जोगीन (बदामी), रमेश बदनूर (बागलकोट), बसवराज तेरदाळ (हुबळी धारवाड पूर्व), विकास सोपीन (हुबळी धारवाड मध्य), नसिमुद्दीन पटेल (बिदर दक्षिण), तुकाराम हजारे (भालकी), बाबुराव अडके (औराद) यांना उमेदवारी मिळाली आहे.
माजी काँग्रेस सदस्य आणि अधिवक्ता ब्रिजेश कलप्पा हे आयटी राजधानीचे व्यावसायिक केंद्र असलेल्या बंगळुरमधील प्रतिष्ठित चिक्कपेठ येथून भाजपचे उदय गरुडाचर यांच्याशी लढत करतील.
ख्यातनाम कन्नड चित्रपट अभिनेता टेनिस कृष्णा यांना तुमकुरू जिल्ह्यातील तुरुवेकेरेसाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे मेहुणे शरत चंद्र हे रामनगर जिल्ह्यातील चन्नपटन विधानसभा मतदारसंघातून आपचे उमेदवार आहेत. त्यांची लढत जेडीएसचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि भाजपचे सी. पी. योगीश्वर यांच्याशी होणार आहे.
पहिल्या यादीत सुप्रीम कोर्टाचे वकील ब्रिजेश कलाप्पा, जे चिकपेटमधून निवडणूक लढवणार आहेत, माजी ब्रुहत बंगळुर महानगर पालीकेचे (बीबीएमपी) अधिकारी के. मथाई (शांती नगर), बी. टी. नगन्ना (राजाजीनगर), मोहन दासारी (सी.व्ही. रमण नगर), शांतला दामले (महालक्ष्मी) यांचा समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *