Wednesday , December 10 2025
Breaking News

मंड्या येथे शिवकुमारविरुध्द एफआयआर

Spread the love

 

बंगळूर : मंड्यामध्ये नुकत्याच झालेल्या प्रजाध्वनी यात्रेदरम्यान कलाकारांवर पैसे फेकल्याप्रकरणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
२८ मार्च रोजी मंड्यातील बेविनहळ्ळी येथे बसमधून प्रजाध्वानी यात्रेला जात असताना शिवकुमार यांनी कलाकारावर ५०० रुपयांच्या नोटा फेकल्या. याबाबत रिटर्निंग ऑफिसरने जेएमएफसी कोर्टात तक्रार दाखल केली. एनसीआरनंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार आता डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बेविनहळ्ळी येथे आयोजित रॅलीदरम्यान बसच्या वरून चलनी नोटा फेकल्याबद्दल कलम १७१ ई अंतर्गत लाच दिल्याच्या आरोपाखाली डी.के. शिवकुमार यांच्या विरोधात मंड्या ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
या घटनेनंतर निवडणूक आयोगाच्या तक्रारीच्या आधारे शिवकुमार यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्याला अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) वारंवार समन्स पाठवले जातात.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *