Wednesday , December 10 2025
Breaking News

भाजपची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; आणखी सात आमदारांना डावलले

Spread the love

 

बंगळूर : मंगळवारी १८९ उमेदवारांच्या पहिल्या यादीनंतर बंडखोरी होऊनही भाजपने बुधवारी रात्री २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.
पहिल्या यादीत नऊ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारणाऱ्या पक्षाने दुसरी यादी तयार करताना विद्यमान आमदार नेहरू ओलेकार, एम. पी. कुमारस्वामी यांच्यासह आणखी सात आमदारांना डावलण्यात आले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतलेल्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघासाठी कोणत्याही उमेदवाराची घोषणा केली नाही. मुख्य रणनीतीकार अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने दुसरी यादी जाहीर केली.
नुकतेच भाजपमध्ये सामील झालेले काँग्रेसचे नेते नागराज छब्बी यांना कलघटगीमधून निवडणूक लढवताना पक्षाने मुडिगेरेचे आमदार एम. पी. कुमारस्वामी यांना डावलून, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाच्या विरोधाचा सामना करत दीपक दोड्डाय्या यांची निवड केली.
अलीकडेच कुमारस्वामी यांनी आरोप केला होता की, दलित असल्याने त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्याचप्रमाणे शिवकुमार यांना चन्नागिरी जागेसाठी तिकीट देण्यात आले आहे, कारण विद्यमान आमदार माडाळ विरुपक्षप्पा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नुकतेच लोकायुक्त पोलिसांनी अटक केली होती, ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
या यादीत दोन महिलांचाही समावेश आहे. कुमारी ललिता अनापूर यांना गुरुमितकल जागेसाठी तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने कोलार गोल्ड फील्ड (एससी) जागेसाठी अश्विनी संपंगी यांची निवड केली आहे. उमेदवारांची तिसरी यादी गुरुवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या यादीत तिकिट गमावलेले आमदार
भायंदूरचे आमदार सुकुमार शेट्टी, चेन्नगिरीचे आमदार माडाळ विरुपक्षप्पा, कलघटगीचे आमदार निंबण्णावर लिंगाण्णा, मुडिगेरेचे आमदार एम. पी. कुमारस्वामी, हवेरीचे आमदार नेहरू ओलेकर, मायकोंडाचे आमदार एन लिंगान्ना, गुरमिटकलचे आमदार नागनगौडा कंदकूर

भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार असे
कलघटगी-नागराज छब्बी
चन्नगिरी-शिवकुमार
देवाची हिप्परगी-सोमणगौडा पाटील
बसवाण बागेवाडी-एस. के. बेळूब्बी
इंडी- कासागौडा बिरादार
गुरुमिटकल-ललिता अन्नपूर
बिदर- ईश्‍वरसिंह ठाकूर
भालकी- प्रकाश खांद्रे
गंगावती-परण्णा मनवळ्ळी
हानगल-शिवराज सज्जनार
हावेरी-गविसिद्धप्पा दमनवर
हरपनहळ्ळी- करुणाकर रेड्डी
दावणगेरे उत्तर- लोकिकेरे नागराज
दावणगेरे दक्षिण- अजय कुमार
मायकोंड-बसवराज नाईक
बायंदूर-गुरुराज गट्टीहोळे
मुडिगेरे-दीपक दोड्डय्या
गुब्बी-एस. डी. दिलीपकुमार
शिडलघट-रामचंद्र गौडा
कोलार गोल्डफिल्ड-अश्विनी संपगी
श्रावणबेळगोळ-चिदानंद
अरसीकेरे-बी. व्ही. बसवराजू
हेग्गडदेवनकोटे-कृष्णा नाईक

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *