Wednesday , March 4 2026
Breaking News

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये दाखल

Spread the love

 

कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली मोठी घोषणा

बेंगळूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अथणी मतदारसंघातून भाजपने पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या माजी उपमुख्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही घोषणा केली.

भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेंगळूरमध्ये १२ एप्रिल रोजी त्यांनी विधानपरिषद सदस्य पदासह भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मी एक स्वाभिमानी राजकारणी आहे, भिकेचा कटोरा घेऊन फिरणारा नाही अशी प्रतिक्रिया लक्ष्मण सवदी यांनी त्यावेळी दिली होती.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *