
बेळगाव : एसएसएलसी परीक्षेत बेळगाव जिल्ह्याचा झेंडा फडकला आहे. सौंदत्तीची कन्या अनुपमा श्रीशैल हिरेहोळी एसएसएलसी परीक्षेत संपूर्ण राज्यात पहिली आली आहे.
अनुपमा हिरेहोळी हिने 625 पैकी 625 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील कुमारेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थीनी आहे.
अनुपमाचे वडील श्रीशैल यांचे वर्षभरापूर्वी आजाराने निधन झाले असून, तिची आई राजश्री सौंदत्ती येथील एका खासगी रुग्णालयात काम करते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि आईच्या प्रोत्साहनामुळे कठोर मेहनत करून अनुपमाने हे यश मिळवल्याने तिचे अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta