बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून गोंधळ उडाला आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला रवाना झाले असून आमदार जमीर अहमद यांनीही सिद्धरामय्या यांच्यासोबत दिल्लीचा प्रवास केला आहे.
एकीकडे केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावत आहेत, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा करत आहेत. दोन्ही नेत्यांनी लॉबिंग सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांना हायकमांडने दिल्लीत बोलावले आहे.
मुख्यमंत्री निवडीच्या मुद्दय़ाच्या पार्श्वभूमीवर हायकमांड सत्तेच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यासंदर्भात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta