Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा सस्पेंस संपला, सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Spread the love

 

बंगळुरू : गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती. डीके शिवकुमार की सिद्धरामैया यापैकी कोण कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार, याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.

कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर अनेक सूत्र हलवण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आधीच दिल्लीला पोहोचले. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मात्र तब्येतीचं कारण देत दिल्लीला येणं टाळलं. मी औषधं आणि इंजक्शन घेतली आहेत, त्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकलो नाही, असं शिवकुमार यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *