Wednesday , December 10 2025
Breaking News

पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ‘फाइव्ह गॅरंटी’बाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढले आदेश!

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसला दणक्यात यश मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं होतं. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जातील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी केलं होतं. आज कर्नाटकात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर, लागलीच विधानसभा मंत्रिमंडळ बैठकही पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे आदेश नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पाच आश्वासने दिली होती. काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांना फाइव्ह गॅरंटी म्हटले होते. या गॅरंटीची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती. मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत काँग्रेसच्या गॅरंटीची कोणतीही वॉरंटी नसल्याची टीका केली होती. पण याच पाच आश्वासनांच्या पूर्तेतेसाठी नवनियुक्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आदेश काढले आहेत. तसंच, पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी विधानसभेत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून पाच आश्वासने दिली
१. ‘गृह ज्योती’अंतर्गत प्रत्येक घरासाठी २०० युनिटची वीज मोफत देण्यात येईल.
२. ‘गृह लक्ष्मी’ योजनेंतर्गत कुटुंबप्रमुख असलेल्या महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये देण्यात येतील.
३. ‘युवा निधी’ योजनेच्या माध्यमातून पदवीधर आणि पदविका घेतलेल्या बेरोजगार तरुणांना भत्ता देण्यात येईल.
४. ‘उचित प्रयत्न’ योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येईल.
५. ‘अन्न भाग्य’ योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेच्या खाली असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला १० किलो धान्य मोफत देण्यात येईल.
या वरील योजनांच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असं आश्वासन सिदधरामय्या यांनी दिलं. दरम्यान या आश्वासन पूर्ततेसाठी सरकारला ५० हजार कोटींचा खर्च येणार असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

केंद्रावर सडकून टीका

“आधीचं सराकर निरुपयोगी होतं. करातील वाटा त्यांनी राज्यात आणला नाही. वित्त आयोगानुसार केंद्र सरकार आम्हाला ५ हजार ४९५ कोटी देणं लागतं. आधीच्या सरकारने हे पैसे आणले नाहीत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कर्नाटकातून राज्यसभा खासदार आहेत. त्यांच्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कर्नाटकचे अतोनात नुकसान झाले आहे”, असं सिद्धरामय्या म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *