बेंगळुरू : माजी मंत्री आणि आमदार यु. टी. खादर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
यु. टी. खादर यांनी विधानसभा सचिव कार्यालयात आल्यानंतर सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यु. टी. खादर यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी के. शिवकुमार, मंत्री जमीर अहमद, आमदार अजय सिंह यांनी पाठिंबा दिला.
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेत्यांनी यु. टी. खादर यांना आश्चर्यकारक उमेदवार म्हणून निवडले आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी काल सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना फोन केला आणि यु. टी. खादर यांना सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची सूचना केली. या घडामोडीनंतर आज यु. टी. खादर यांनी विधानसौध येथे जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
विधानसभेच्या अध्यक्षांची निवड उद्या होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta