
बेंगळुरू: माजी मंत्री आमदार यू. टी. खादर यांची विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून आमदार यू. टी. खादर यांची बिनविरोध निवड झाली असून आर. व्ही. देशपांडे यांनी खादर त्यांच्याकडे पदभार सोपवला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नूतन अध्यक्ष यू. टी. खादर यांचे अभिनंदन केले. यू. टी. खादर हे अतिशय उत्साही आणि सक्रिय राजकारणी असून ते ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. माझ्या सरकारच्या काळात तुम्ही मंत्री म्हणूनही काम केले आहे. सभागृहात सर्वाधिक प्रश्न विचारल्याबद्दल सदनवीर पुरस्कारही तुम्हाला मिळाला आहे. सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सरकारच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta