मतदान ओळखपत्र, आधार कार्ड सक्ती: केवळ कर्नाटकातच सवलत
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने पाच गॅरंटी दिल्या होत्या. पैकी महिलांना मोफत बस प्रवासचा प्रारंभ रविवारपासून (ता.११) होत आहे. त्यासाठी मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. कर्नाटक राज्यात कुठेही महिला प्रवास करू शकतात. मात्र महाराष्ट्र हद्दीपासून जाताना त्यांना तिकीट काढावे लागणार आहे. येथील निपाणी आगारात रविवारी (ता.११) सकाळी ११ वाजता या योजनेचा प्रारंभ होणार असून दुपारी एक वाजल्यापासून प्रत्यक्षात मोफत बस प्रवास सुरू होणार आहे.
काँग्रेस सरकारने महिलांसाठी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. त्यापैकी मोफत बस प्रवासाचा प्रारंभ रविवारपासून होत आहे. त्यापासून वर राजभर तिकीट मशीन मध्ये डाटा फीडिंगचे काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने महिलांना अर्धा तिकीट सवलत दिली आहे. त्या पाठोपाठ आता कर्नाटकात प्रथमच महिलांसाठी संपूर्ण बस प्रवास मोफत केला आहे. त्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. कर्नाटक राज्यात कुठेही बस प्रवास करताना वातानुकूलित बस वगळता साधी आणि जलद बस सेवा महिलासाठी उपलब्ध आहे. रविवारी दुपारी एक वाजल्यापासून या उपक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून सकाळी अकरा वाजता औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम निपाणी आगारात पार पडणार आहे.
—————————————————————-
सीमा भागाबाबत संभ्रम
कर्नाटक शासनाने कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील २० किलोमीटर अंतरा पर्यंत ही सुविधा देणार असल्याचे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निपाणी येथून कोगनोळी हद्दीपर्यंतच महिलांना मोफत प्रवास सवलत मिळणार आहे त्यानंतर कोल्हापूर कडे जाताना पुढील प्रवासात तिकीट काढावे लागणार आहे.
—————————————————————–
विद्यार्थिनींनाही मोफत बस
शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात निपाणी आगारातून दरवर्षी बस पास योजना जात होती. पण आता रविवारपासून महिला बरोबरच विद्यार्थिनींनाही बस सेवा मोफत केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
—————————————————————–
‘रविवारपासून महिला व विद्यार्थी साठी मोफत बस सेवा सुरू होणार आहे. अकरा वाजता या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाल्यापासून प्रत्यक्षात मोफत बस सेवेची फेरी सुरू होणार आहे. त्यासाठी मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.’
– संगाप्पा, आगार प्रमुख, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta