Tuesday , March 3 2026
Breaking News

मोफत बस प्रवासासाठी झेरॉक्स प्रती ग्राह्य

Spread the love

 

बेळगाव : रविवारपासून कर्नाटक काँग्रेसच्या शक्ती योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेला महिला वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करताना ओळळखपत्राची झेरॉक्स प्रत किंवा मोबाईलमधील डिजी लॉकर मधील कोणतेही ओळखपत्र दाखवून मोफत बस प्रवास करता येणार आहे, असे स्पष्टीकरण राज्य परिवहन मंडळाने दिले आहे.
राज्यात काँग्रेस सरकारने शक्ती योजना लागू केली. मात्र कंडक्टर महिला प्रवाश्यांकडे आधार किंवा मतदार ओळळखपत्राची मूळ प्रत दाखविण्याची सक्ती करत आहेत. त्यामुळे काही महिलांना तिकीट काढून प्रवास करावा लागला तर काही ठिकाणी कंडक्टर व महिला प्रवाश्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली मात्र राज्य परिवहन मंडळाच्या स्पष्टीकरणामुळे या वादावर पडदा पडला.
मोबाईल डिजी लॉकरमध्ये असणारे ओळ्खपत्र किंवा मूळ दाखल्याची प्रत दाखवून महिला व विद्यार्थिनींना मोफत प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारकडून पुढील तीन महिन्यात शक्ती स्मार्ट कार्ड वितरणाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर महिलांना स्मार्ट कार्ड दाखवून प्रवास करता येईल तोपर्यंत महिलांना केएसआरटीसी, बीएमटीसी, एनडब्ल्यूकेआरटीसी आणि केकेआरटीसीच्या बसेस मधून प्रवास करता येणार आहे. रविवारी दुपारपासून शक्ती योजनेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर अर्ध्या दिवसातच राज्यभरातील चारही परिवहन निगमाच्या बसेस मधून 51 हजार 723 महिलांनी मोफत प्रवास केला आहे. या महिलांना शून्य तिकीट देण्यात आले मात्र या प्रवासाची तिकीट मूल्य एक कोटी 40 लाख 22 हजार 887 रुपये इतकी होते. ही रक्कम परिवहन निगमला राज्य सरकारकडून अदा केली जाणार आहे. सरकारने विद्यार्थीनी आणि महिलांसाठी मोफत बससाठी शक्ती योजना जाहीर केली आहे त्यामुळे पर्यावरण महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्यासाठी महिलांची गर्दी उसळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *