Monday , September 21 2026
Breaking News

जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे ५.४ तीव्रतेचा भूकंप; दिल्लीसह उत्तर भारतातही धक्के

Spread the love

 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये आज ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. एचपी, चंदीगड, पंजाब आणि सर्व लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले असावेत. कदाचित आफ्टरशॉक मुख्य धक्क्यापेक्षा कमी तीव्रतेचा असेल, अशी माहिती डॉ. ओपी मिश्रा, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी दिली आहे.

या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि उत्तर भारताच्या काही भागातही जाणवले आहेत. उत्तर भारतातील चार राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडपासून ३० किमी आग्नेयला ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, अशी माहिती एएनआयने ट्विट करून दिली आहे. दरम्यान भूकंपात अद्याप तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *