बेळगाव : कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री व राज्यातील सर्व जिल्ह्यातील चेंबर ऑफ कॉमर्स शाखांच्या वतीने आगामी 22 जून रोजी एकदिवसीय कर्नाटक बंद ची हाक देण्यात आली आहे कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (केसीसी अँड आय)). कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि इतर सर्व जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्सने अलीकडील वीज दरवाढीविरोधात सर्व व्यापाऱ्यांनी आणि उद्योगजकांनी एक दिवस आपले व्यवहार बंद ठेवावेत अशी विनंती केली आहे. गेल्या 8 दिवसांपासून वीज दरवाढीमुळे होणाऱ्या परिणामांचे गांभीर्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अधिकारी किंवा सरकारी प्रतिनिधींकडून कोणताही तोडगा निघत नाही.
याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या बंदची हाक देत आहोत. त्यावर उपाय शोधून वीज शुल्कात कपात करण्याची आमची इच्छा आहे. आशा आहे की सरकार आमच्या विनंतीला प्रतिसाद देईल असे राज्य चेंबर ऑफ कॉमर्सने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या बंदची हाक देत आहोत. यावर तोडगा काढावा आणि वीज शुल्कात कपात व्हावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला आशा आहे की सरकार आमच्या विनंतीला प्रतिसाद देईल, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta