
बंगळुरू : बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील प्रसिद्ध जैन मुनी १००८ कामकुमार स्वामीजी यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी. तसेच संबंधितावर कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यात संत महात्मे व हिंदू कार्यकर्त्यावर होणारे अन्याय थांबवावे. अशा विविध मागण्यासाठी कर्नाटक राज्यातील भाजपच्या आमदारांनी बेंगलोर विधानसौध समोरील गांधीजींच्या पुतळ्यापासून राजभवनापर्यत तीव्र मोर्चा काढून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात खानापूर तालुक्याचे अआमदार विठ्ठलराव हलगेकर, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यासह भाजपचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपालांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यापासून हिंदू मठ मठाधीश त्याचबरोबर हिंदू कार्यकर्त्यांना संरक्षण राहिले नाही. देश संस्कृती जतनासाठी मठ मठाधीशांची संत महात्म्याची अत्यंत गरज आहे. पण अशाच मठाधीशांची म्हणजे जैन स्वामी जी सारख्याची होत्या गेल्यास धर्माचरण राहिल? यासाठी सरकारने योग्य ती काळजी घ्यावी व दोषींवर कारवाई करावी.
Belgaum Varta Belgaum Varta