बेंगळुरू : नंदीपर्वत आश्रमातील जैन मुनींच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.
विधानसभेत याविषयी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमातील जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपविला जाईल.
जैन मुनी हत्या प्रकरणाचा अधिक तपास व्हायला हवा. जनतेच्या आग्रहास्तव या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जैननमुनी हत्येप्रकरणी दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून बेळगाव पोलिसांचा तपास सुरू आहे. पुढील तपासासाठी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta