बेंगळुरू : नैऋत्य मोसमी पावसाचा जोर आजपासून राज्याच्या किनारी भागासह अंतर्गत भागात वाढण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्याच्या किनारपट्टी आणि उत्तरेकडील अंतर्गत भागासाठी आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर दक्षिणेकडील अंतर्गत भागासाठी पिवळा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
उत्तरेकडील भागात आज ऑरेंज अलर्ट, पुढील 4 दिवस पिवळा इशारा, दक्षिणेकडील भागात आजपासून पुढील 5 दिवस पिवळा इशारा. बंगळुरूमध्ये काही वेळा मध्यम पावसासह ढगाळ हवामान कायम राहील.
Belgaum Varta Belgaum Varta