बंगळुरू : उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना कर्नाटकात घडलेली आहे. न्यायालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला (पीआरओ) फोनद्वारे ही धमकी देण्यात आली असून, धमकीचा मॅसेजही व्हॉट्सअपवर पाठवण्यात आला.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे पीआरओ के. मुरलीधर यांनी यासंदर्भात बंगळुरु पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १२ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने मुरलीधर यांच्या कार्यालयीन व्हॉट्सअप क्रमांकावरही धमकीचा संदेश पाठवला. ज्यामध्ये फोन करणाऱ्याने पाकिस्तानमधील एबीएल बँकेचा (अलाईड बँक लिमिटेड) खाते क्रमांक पाठवून संबंधित खात्यावर ५० लाख रुपये जमा करण्याची आणि तत्काळ पैसे न पाठवल्यास उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना ठार मारण्याची धमकीही दिलेली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta